You are currently viewing केशवसुट्टयाची दिवाळी मैफिल रविवारी..

केशवसुट्टयाची दिवाळी मैफिल रविवारी..

सावंतवाडी

येथील केशवसुट्टा ग्रुपतफेँ रविवारी 15 नोव्हेंबर सायंकाळी पाच ते सात या वेळेत कळसुलकर शाळेतील परुळकर हाँल मध्ये खास दिवाळी मैफलीचे आयोजन केले आहे.
ही मैफिल सर्व रसिक, कलाकारांसाठी खुली आहे. सोशल डिस्टंसींगचे संबधीचे नियम पाळून साजरी होणार आहे.  जनतेने दिवाळी दरम्यान या सकंटाला ब-यापैकी झुंज दिली आहे. लाँकडाऊन नंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत असतांना सांस्कृतिक क्षेत्रात आणि जनतेतही नवचैतन्य फुलण्याच्या द़ष्टीकोनातून या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टंसींगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित होत आहे.
दिवाळी मैफिलीत हिंदी मराठी चित्रपटातील जुनी सदाबहार गीते, कथा वाचन, किस्से कविता वाचन करण्याची संधी कलाकारांना मिळणार आहे. हामोँनिअम वादक गायक शंकर प्रभू, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोसकर या कार्यक्रमाचे संयोजन करतील. ज्या हौशी इच्छुक कलाकारांना सादरीकरण करायचे असेल त्यांनी गोठोसकर (9820050217)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केशवसट्टा मित्रमंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =