मुलांची गुणवत्ता पाहणं महत्त्वाचं
पारख केल्यास खऱ्या अर्थानं मुलांची प्रगती…
बालरोग तज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत
सावंतवाडी
मुलांनी त्यांचा नैसर्गिक कल आवड असलेल्या क्षेत्रात जावे. मुलांची ही गुणवत्ता पाहण्याचे काम पालकांचे आहे. पालक व शिक्षक यांनी मुलांचा कल नेमका कशा कडे आहे याची पारख केल्यास मुलांची खऱ्या अर्थाने प्रगती होण्यास मदत होते. शिक्षण हे मानसिक ताण न देता हसत खेळत व्हायला हवे मुलांमध्ये त्याची आवड निर्माण व्हायला हवी. त्यामुळेच अभ्यासातून केवळ शिक्षण मिळण्याबरोबरच मुलांचा शारीरिक मानसिक अध्यात्मिक व सामाजिक असा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत यांनी केले.
पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या स्टेपिंग स्टोन या संस्थेच्या बांदा येथील “प्री” स्कुलचे उद्धाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. दत्तात्रय सावंत यांनी मुलांच्या जडणघडणीचे महत्त्व विशद केले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, सामाजिक कार्यकर्ते सिध्देश पावसकर, रामप्रसाद पाटणकर, डॉ.रुत्वीज पाटणकर, संस्थेचे संस्थापक रुजूल पाटणकर, उमेश पावसकर आदी उपस्थित होते.
स्टेपिंग स्टोनच्या माध्यमातून या प्रकारचेदर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे शिक्षणापलिकडे जावून प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तीक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या संस्थेत बांद्यातील जनतेेने आपल्या मुलांना निश्चितच पाठवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संस्थापक रुजूल पाटणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. पाटणकर शिक्षण संस्थेत मुलांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता कृतिशील शिक्षण देण्यावर आमचा अधिक भर असतो. पालकांना आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करू तेच आमचे कर्तव्य आहे असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
तसेच संस्थेच्या माध्यमातून काम करतांना मला आई वडीलांचे नेहमीच पाठबळ मिळाले आहे, नेहमीच नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहिला, पालकांना आपल्या मुलांकडून जे अपेक्षित आहे ते जाणून घेऊन मुलांचे वय व त्यांची आवड यांची सांगड घालत त्यांचा कल असलेले शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करून असे यावेळी रुत्वीज पाटणकर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रम प्रसंगी पालक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.