You are currently viewing सावंतवाडीत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात

सावंतवाडीत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात

सावंतवाडीत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात

सावंतवाडी

‘सियावर रामचंद्र की जय ‘, ‘जय श्रीराम ‘ असा राम नामाचा जयघोष करून पुष्प सुमनांची व गुलालाची टाळ-मृदंगांच्या गजरात बुधवारी शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मारुती मंदिरात रामनवमी अर्थात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभ श्री रामाची मूर्ती ठेवण्यात आली. रामनवमीनिमित्ताने शेकडो भाविकांनी रामनामाचा जप करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.

सावंतवाडीतील राजवाड्यासमोर असलेल्या श्री हनुमान मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्सव साजरा करण्यात आला. राम जन्मो त्सवाची घटिका जवळ येत असताना शंखध्वनीमध्ये रामनामाचा जयघोष करणाऱ्या भक्तांचा उत्साह दुणावला होता. दुपारी १२ वाजेचा तो जन्मोत्सवाचा क्षण जवळ आला आणि उत्साह अधिक वाढला त्यानंतर श्रीरामांच्या जयघोषात पुष्प, गुलालाची उधळ करीत हा क्षण साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या आवारात महिलांनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून ‘राम जन्माला ग सखे, राम जन्मला ‘ असे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात आला. राम-जन्मोत्सवानिमित्ताने मंदिराच्या आवारात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 20 =