You are currently viewing शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण

शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण

२१ एप्रिलपासून सावंतवाडीत

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन यांच्यावतीने उन्हाळी सुट्टीत २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिनव फौंडेशनने गेल्या वर्षीही शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर खास लोकाग्रहास्तव यावर्षी प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करुन दहा दिवशीय विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील फिरंगोजी शिंदे आखाड्याचे संचालक वस्ताद प्रमोदजी पाटील यांच्या अनुभवी टीमसह या शिबिरातील प्रत्येक शिबिरार्थीना वैयक्तिक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीरात लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा प्रशिक्षण दिले जाईल.

या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून प्रथम येणा-यांना प्रथम संधी या तत्वावर १७ एप्रिल पर्यत नोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. या शिबिराच्या नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी किशोर चिटणीस ९४२१०७३३८३ आणि राजू केळुसकर अभिनव स्टोअसँ मच्छिमाकेँट सावंतवाडी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन अभिनव फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डाँ.प्रसाद नावेँकर आणि सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 5 =