You are currently viewing उद्योगमंत्री नारायण राणे १५ एप्रिल रोजी चिपळूण दौऱ्यावर

उद्योगमंत्री नारायण राणे १५ एप्रिल रोजी चिपळूण दौऱ्यावर

रत्नागिरी :

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी निवडणुकीचे रणांगण तापविण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ता मेळावे होत आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे सोमवार दिनांक १५ एप्रिल रोजी चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी पेढांबे व चिपळूण शहरात महायुतीचे कार्यकर्ता मेळावे होणार आहेत. यामुळे या मेळाव्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी व लांजा राजापूर येथे जनसंवाद मिळावे झाले. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण शहरात महायुती कार्यकर्ता मिळावे झाले. तर केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री ना. नारायणराव राणे सोमवारी चिपळूण दौऱ्यावर येत असून सकाळी १०.३० वाजता चिपळूण ग्रामीण महायुती कार्यकर्ता मेळावा पेढांबे येथील हॉटेल पुष्कर गार्डन येथे होईल. तर संध्याकाळी ४ वाजता चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात शहर महायुती कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा