You are currently viewing STS व डॉ.एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नं 2 शाळेचे घवघवीत यश..

STS व डॉ.एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नं 2 शाळेचे घवघवीत यश..

STS व डॉ.एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नं 2 शाळेचे घवघवीत यश..

सावंतवाडी

दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च म्हणजेच STS परीक्षेत जि.प.पूर्ण कारीवडे पेडवे नं.२ शाळेेच्या विद्यार्थ्यांंनी घवघवीत यश मिळवले.

इयत्ता२री ते ७ वीचा STS परिक्षेत निकाल १००% लागला.इयत्ता ३री मधील वैभव सत्यवान परब याला १६२गुणांसह गोल्ड मेडल तसेच इयत्ता ४थी मधील वैभव प्रविण हनपाडे याला १४८गुणांसह सिल्व्हर मेडल,सावी नागेश गावडे हिला ११६ गुणांसह ब्राँझ मेडल प्राप्त झाले इयत्ता ६वी मधील भदू सत्यवान परब याने१३६ गुण मिळवून सिल्व्हर मेडलसह जिल्ह्य़ात टाईप फिफ्टी यादीत स्थान प्राप्त झाले.

तसेच १७मार्च२०२४रोजी संपन्न झालेल्या डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता४थीच् निकाल १००% लागला.९पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इयत्ता ७वी मधील तनिष्क प्रतापराव गवळी ही उत्तीर्ण झाली.स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ,शिक्षक पालक संघ तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा