निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मध्ये नाकाबंदी मोहीम..
कुडाळ
पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखा, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत कुडाळ एस. एन. देसाई चौक येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली १४ अंमलदार यांनी ही नाकाबंदी मोहीम पूर्ण केली.
यामध्ये वाहन तपासणी करून त्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी एएसआय साळस्कर, एएसआय झरकर, एएसआय सुर्वे, पो. ह. गवस, पो. ह. गुडेकर, पो. ह. हडकर, पो. ह. वेंगुर्लेकर, पो. ना. भोगले, म. पो. ना. वागदकर, पो. शि. आबीटकर, पो. शि. वावरे, पो. शि. जाधव, पो. ह. जाधव, पो. शि. शिरडे या टीमने मोहीम राबविली. चारचाकी वाहनचालकांनी ब्लॅक फिल्म काढून टाकणे बंधनकारक असेल. तसेच महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक असेल.