You are currently viewing एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी आणि ट्रॅक अँड फील्ड क्लब आयोजित जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी आणि ट्रॅक अँड फील्ड क्लब आयोजित जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

*एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी आणि ट्रॅक अँड फील्ड क्लब आयोजित जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.*

कुडाळ

दिनांक 28-01-2024 रोजी घेण्यात आलेल्या रनिंग, रिले आणि लांब उडी स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या एकूण 110 खेळाडूंनी रोख रुपये 30000/-, मेडल्स आणि प्रमाणपत्र मिळवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एस सी स्पोर्ट्सचे श्री.सुमुख सदाशिव चव्हाण आणि श्री.क्रिस्टन रोड्रीक्स या दोन NIS COACH नी ही स्पर्धा कुडाळ हायस्कूल ग्राउंड येथे पहिल्यांदाच आयोजित केली.

येत्या काळात अधिकाधिक मुले खेळात यावी अशी भावना ठेऊन रोख पारितोषिक रुपये 30000/- आणि मेडल व सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. यात अनन्या कुंभार आणि आकांक्षा कुंभार या बहिणींनी आपापल्या वयोगटात प्रत्येकी २ मेडल्स मिळवली. तर मानस भालचंद्र दाभोळकर हा १७ वर्षाखालील तीनही क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवत सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. या स्पर्धेसाठी श्री. रणजितसिंह राणे सर (सिंधुदुर्ग अथलेटिक्स असो.), श्री. बी बी शेख सर (एक्स आर्मी मन), श्री. मयेकर सर (कुडाळ हायस्कूल), दाभोलकर सर आणि मंगेश पटवर्धन सर यांचे मार्गदर्शन आणि सर्व पालकांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा