You are currently viewing रुपेश राऊळ यांनी दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करू नये – अमीत परब

रुपेश राऊळ यांनी दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करू नये – अमीत परब

रुपेश राऊळ यांनी दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करू नये – अमीत परब*

आघाडीचा धर्म म्हणून आताच विधानसभेच्या उमेदवारीला अर्चना घारे परब यांना पाठींबा द्यावा*

सावंतवाडी

आमची महाराष्ट्रात महायुती आहे त्यामुळे विधानसभेत आम्ही काय करणार याची काळजी रुपेश राऊळ यांनी करू नये ,त्यांनी आताच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या सावंतवाडी विधानसभेच्या उमेदवार म्हणून अर्चना घारे परब यांचे नाव जाहिर करावे असे आव्हान चराठा उपसरपंच अमीत परब यांनी रुपेश राऊळ यांना दिले आहे.

तुम्ही जर महाविकास आघाडीबद्दल इतके आशावादी असाल तर आताच विधानसभेसाठी उबाठा सेनेचा दावा सोडून राशप च्या अर्चना घारे परब यांना पाठिंबा जाहिर करून दाखवावा असे प्रत्युत्तर अमित परब यांनी रुपेश राऊळ यांना दिले. दुसऱ्यांच्या पक्षात लुडबुड करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळते याची काळजी राऊळ यांनी करावी असा टोलाही अमित परब यांनी लगावला.
गेल्या दहा वर्षात एकही रोजगार आणू न शकणारे विनायक राऊत यांनी गावदौरे केले मात्र कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकले नाही. हिंमत असेल तर सावंतवाडी तालुक्यातील गावात दिलेल्या विकासनिधीचा हिशोब द्यावा. तसेच आपला निधी खर्च न करणारा खासदार आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदासंघात नको अशी भावना सर्वांची झाली आहे असा टोलाही अमित परब यांनी लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा