You are currently viewing व्हिडीओ गेमच्या आडून जुगार

व्हिडीओ गेमच्या आडून जुगार

व्हिडीओ गेमच्या आडून जुगार

कुडाळातील ५ पार्लरवर छापा, ८ जणांवर गुन्हा दाखल

कुडाळ

व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणार्‍या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या मालकांना आज ताब्यात घेण्यात आले आहे. यात कारवाईत ४३ हजाराच्या रोख रक्कमेसह ४६ मशीन मिळून तब्बल ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई काल रात्री साडे सात ते रात्री अकरा वाजे पर्यंत करण्यात आली. मध्यरात्री या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण जयराम माळवे (वय ३८, रा. कुडाळकर चाळ, केळबाई मंदिर जवळ ता कुडाळ), महादेश रतन निषाद (वय ३३, रा. रेल्वेस्टेशन रोड कुडाळ), भिमराव ऐबत्ती परगणी (वय ४४, रा. आंबेडकर नगर कुडाळ), संजय महादेव वाडकर (वय ५२, रा. सबनिसवाडा-सावंतवाडी) , रफिक कादरसाब अगडी (वय ४६, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा), वैभव यशवंत सरमळकर (वय २७, रा. कदमवाडी कुडाळ), शैलेशकुमार धरमसेन गुप्ता (वय ३९, रा. सालईवाडा-सावंतवाडी) अक्षय अनिल धारगळकर (वय २९, रा. कुडाळ मधली कुंभारवाडी, ता. कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत.

या कारवाईत ओमसाईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम यांच्यावर करण्यात आली. दरम्यान यातील सर्व संशतियांनी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तर गुन्हा दाखल करण्यात आलेले कामगार आणि खेळणारे आहेत. त्या व्हिडीओ गेम मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे तपासिक अमंलदार गणेश कर्‍हाडकर यांनी सांगितले.

ही कारवाई कर्‍हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भिमसेन गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक रविंद्र भांड, हवालदार गणेश चव्हाण, कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबतची माहिती कुडाळ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावावर जुगार खेळला आहे. त्यातून आर्थिक व्यवहार होत आहे, अशी तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे कर्‍हाडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा