मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण होणे गरजेचे – उमाकांत वारंग
सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन…
सावंतवाडी
इंटरनेटच्या विळख्यात सापडलेल्या मुलांना लहान वयातच मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धा ही मोलाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी केले.
जय महाराष्ट्र कला क्रीडा मंडळ व हॉकर्स संघटना आयोजित जिल्हास्तरीय वयोमर्यादित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री वारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लहान वयोगटातील एकूण २५ संघ सहभागी झाले होते.
यावेळी शिवभवानी क्रीडामंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, लक्ष्मी जाधव, इंदु जाधव, राष्ट्रीय खेळाडू अभय जाधव, गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्त्या निकिता चव्हाण, राज्यस्तरीय पंच कृष्णा सावंत, राजू चव्हाण, रोहित आरोंदेकर, अमेय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.