You are currently viewing खोपोली च्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

खोपोली च्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

खोपोली च्या के एम सी महाविद्यालयाच्या जिव्हाळा ग्रुपचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

खोपोली-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर )

के. टी. एस. पी. मंडळाचे के. एम. सी. महाविद्यालय तृतीय वर्ष कला शाखा सन १९८४-८५ या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. अडतीस वर्षानंतर महाविद्यालयात एकत्र आल्याने विद्यार्थ्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
सकाळपासून सर्व वर्गमित्र, मैत्रीणी , वेगवेगळया ठिकाणाहून वर्गमित्र आले होते. या स्नेहसंमेलना करिता प्राचार्य युवराज महाजन , विद्यमान प्राचार्य – प्रताप पाटील , उपाध्यक्ष – दिलीप पोरवाल , उपप्राचार्य – आण्णासाहेब साहेब कोरे , कार्यालय अधीक्षक- सौ.गीता नाईक , लॅब असिस्टंट- बाळकृष्ण कालेकर ( महाराज) आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.
सुरुवातीला सर्वांनी एकत्र आल्यानंतर चहा, नाष्टा करून कॉलेजच्या इमारतींना भेटी दिल्या. नंतर हास्य -विनोद करत गीत गात, तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव कथन करत सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
जिव्हाळा ग्रुपची आठवण रहावी म्हणून एक वडाचे झाड लावण्यात आले महाविद्यालयाला भेट वस्तू देऊन दिवसभर उत्साही वातावरणात आनंद देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे आनंदाची शिदोरी बांधून संपन्न झाला.
के एम सी महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भोसले सर यांच्या आठवणीने अनेकदा सभागृह भावनिक झाले.
स्नेह संमेलन यशस्वी करण्याकरिता जिव्हाळा ग्रुपचे संयोजक दिनकर भुजबळ , अनिल आंग्रे यांनी व सर्व मित्रांनी मेहनत घेतली.उपस्थित मान्यवरांनी स्नेह संमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

*संवाद मिडिया*

*🚘 🚗 माई ह्युंदाई 🚗 🚘*
*👉अविरत सेवेची 25 वर्षे*

*गुढी पाडव्याला घेवुन या सोन्यासह आपली स्वताची कार 🚗🚗🚗🚗🚗🚗*

*🪙गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने जिंकण्याची सुवर्ण संधी*

*२० ते २४ मार्च या कालावधीत बुकिंग करणार्या ग्राहकाना नेहमीच्या ऑफर्ससह २ ग्रॅम सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी*

*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार घ्यायची आहे तर आजच आपली ह्युंदाई कार बुक करा*

*💥ही ऑफर फक्त लिमिटेड स्टॉकवर……*
https://sanwadmedia.com/129953/

*💁‍♂️ भरघोस डिस्काउंट आणि आकर्षक योजनांचा धमाका..!!*

*💥 ह्युंदाईच्या कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं*
*….. आता तर सोनं सुध्दा !*

*सोबत मिळवा आपल्या जुन्या कारला एक्सचेंज व त्वरीत 100% फायनांस*

*नियम आणि अटी लागू*

*▶️ टेस्ट ड्राइव्ह, बुकींगसाठी आजच संपर्क साधा*

*माई ह्युंदाई कुडाळ*

*📲741006037*
*माई ह्युंदाई कणकवली*

*📲7722055041*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/129953/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − fourteen =