You are currently viewing डांगमोडे येथे जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ला व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत जय गणेश मालवण महिला संघ विजेता

डांगमोडे येथे जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ला व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत जय गणेश मालवण महिला संघ विजेता

मसुरे :

 

मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये जय मानसीश्वर वेंगुर्ला संघाने शिव दैवत नेरूळ कुडाळ कबड्डी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. शिवदैवत नेरूळ कुडाळ संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत जय गणेश मालवण महिला कबड्डी संघाने शुभम देवगड महिला कबड्डी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. तर शुभम देवगड महिला कबड्डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण १० संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक गीरोबा सांगेली कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या संघांला रोख रू ५०००, उपविजयी संघाला रोख रुपये ३०००, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाना रोख रुपये प्रत्येकी दीड हजार आणि कै. शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात आले. या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून भक्ती यश साळगावकर, उत्कृष्ट पकड अक्षय चव्हाण, उत्कृष्ट चढाई ओमकार साहिलकर यांची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रुपये आणि स्मृती चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच तुषार साळगावकर, सी ए नाईक, जयेश परब, हेमंत गावडे,अमित गंगावणे, पंकज राणे, श्री साळुंखे सर,शैलेश नाईक, नितीन हडकर, प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्यवाहक छोटू आंगणे,उप चिटणीस श्री काका आंगणे, बाबू आंगणे, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर,हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर,मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भटके विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टी राज्य उपाध्यक्ष बाळा गोसावी,माजी जि प अध्यक्ष सरोज परब, भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक दीपक पाटकर, वेरली सरपंच धनंजय परब बिळवस सरपंच मानसी पालव, गणेश कुशे,बाळा आंगणे, पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब,गणेश आंगणे, अनंत भोगले, जगदीश चव्हाण, सचिन पाटकर आणि डांगमोडे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ठाकूर व आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =