You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था अधक्षपदी सुनिल राऊळ 

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था अधक्षपदी सुनिल राऊळ 

उपाध्यक्षपदी जेम्स बोर्जीस बिनविरोध निवड..

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक सन २०२३-२८ या कालावधीत बिनविरोध पार पडली. संस्थेच्या पदाधिकायांची निवड करण्यासाठी संस्थेचे निवडणुक अधिकारी राजन बा. राणे यांच्या अध्यक्षेखाली सोमवारी सकाळी संपन्न झाली. यावेळी या सभेत संस्थेचे अध्यक्षपदी सुनील बाबु राऊळ व उपाध्यक्षपदी जेम्स झुजे बोर्जीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नुतन कार्यकारीमध्ये संचालकपदी फ्रँकी ॲन्थोनी डॉन्टस, प्रल्हाद लक्ष्मण तावडे, मायकल डायगो आल्मेडा, आशिष इनास परेरा, दिपक पुंडलिक राऊळ, विठ्ठल तुकाराम बिडये, वैदही विद्याधर गावडे, ज्योती प्रसन्ना देसाई, महेश्वर शिवराम कुंभार, अशोक कृष्णा सांगेलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

यावेळी नुतन अध्यक्ष श्री सुनील बाबु राऊळ यांना संस्थेचे अधिकाधिक आर्थिक विकास करण्यासाठी संस्थेत विविध योजना लाभवण्याचे सांगितले तसेच संस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच ठेविदारांसाठी विविध योजना लाभवण्यात असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे सर्व नुतन संचालक उपस्थित होते. निवडणुक अधिकारी श्री राजन या. राणे आणि संस्थेचे सचिव श्री. किशोर रावराणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =