You are currently viewing साडेचारशे वर्षांची गौरवशाली परंपरा आजही कायम….

साडेचारशे वर्षांची गौरवशाली परंपरा आजही कायम….

ओटवणेत सामूहिक भात कापणीला शुभारंभ

सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा असलेल्या ओटवणे येथील ‘नव्या’ चा अर्थात सामूहिक भात कापणीचा शुभारंभ मंगळवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने करण्यात आला.

या निमित्ताने या गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या आकर्षक तोरणाचा साज सजला होता. दरवर्षी पूर्वा नक्षत्रात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नवे साजरे करण्याची प्रथा आहे.  यासाठी कुळघराकडे सकाळीच दवंडी देण्यात आली.  त्यानंतर सकाळी कुळघराकडे ग्रामस्थ जमा झाले. यावर्षी गाव प्रमुख रविंद्र गावकर यांच्या भात पिकाची नव्यासाठी निवड करण्यात आली. नवे साजरे करण्याच्या ठिकाणी देवस्थानचे मानकरी सेवेकरी ग्रामस्थ आल्यानंतर ढोलाच्या गजरात हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या पिकाच्या संवर्धनासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर केसरे असलेली भातरोपे कापून ती कापडात लपेटून ग्रामस्थ पुन्हा सवाद्य कुळघराकडे आले, आणि हे नवे घेऊन ग्रामस्थ आपल्या घरी मार्गस्थ झाले.  त्यानंतर पुन्हा या नव्याची गंध पुष्प पिंजर लावून पूजा करून हे नवे तोरणाच्या स्वरूपात आकर्षक सजविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + seventeen =