You are currently viewing वैभववाडी पोलिसांच्या कारवाईत भुईबावडा तपासणी नाक्यावर गांजा सह गुप्ती जप्त : कोल्हापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल

वैभववाडी पोलिसांच्या कारवाईत भुईबावडा तपासणी नाक्यावर गांजा सह गुप्ती जप्त : कोल्हापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल

वैभववाडी पोलिसांच्या कारवाईत भुईबावडा तपासणी नाक्यावर गांजा सह गुप्ती जप्त : कोल्हापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल

 

वैभववाडी

भुईबावडा रिंगेवाडी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी गांजासह एक गुप्ती जप्त केली आहे. या घटनेतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

सदर इसम कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा भुईबावडा घाट मार्गे प्रवास करत होते. सोमवारी सकाळी ५:४५वाजता तपासणी नाक्यावर असलेल्या पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. गाडीमध्ये ११९.२७ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपी सौरभ संजय साळुंखे, मंजुनाथ रामण्णा कोरवी व रवी राजू भोसले सर्व राहणार कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा