You are currently viewing कुडाळ शिवसेना महिला शहरसंघटकपदी सौ.श्रेया गवंडे तर उपशहरप्रमुखपदी सौ.रोहीणी पाटील, सौ.दुर्वा गवाणकर यांची निवड

कुडाळ शिवसेना महिला शहरसंघटकपदी सौ.श्रेया गवंडे तर उपशहरप्रमुखपदी सौ.रोहीणी पाटील, सौ.दुर्वा गवाणकर यांची निवड

कुडाळ :

 

कुडाळ शिवसेना शहराची बैठक नुकतीच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिध्दीविनायक हाॅल येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी कुडाळ शिवसेना महिला शहरसंघटक सौ.श्रेया गवंडे, महिला उपशहरप्रमुख सौ.रोहीणी पाटील व सौ.दुर्वा गवाणकर यांची निवड शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते सौ जान्हवी सावंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.

कुडाळ शिवसेना शहर बैठक नुकतीच सिध्दीविनायक सभागृहात खा. राऊत, आम नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी कुडाळ शहरात शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम संघटनेचे सुरु असुन महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या माध्यमातून अतिशय चांगले काम सुरू असुन त्याचीच पोचपावती म्हणून आजची ही उपस्थितीती आहे, असे खा राऊत यांनी सांगुन उपनगराध्यक्ष किरण शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेचे काम अगदी जोमाने सुरू असून याचे समाधान आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

कुडाळ मधील मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, कुडाळ एस टी स्टॅण्ड, भंगसाळ बंधारा आणि कुडाळ शहरातील विकास कामे ही ठळक कामे आहेत. कुडाळ शहरातील महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अतिशय चांगले काम करीत असल्याने आजची उपस्थिती चांगली आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल बंगे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सौ ज्योती जळवी, नगरसेविका सई काळप, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख सौ मेघा सुखी, कुडाळ तालुका शिवसेना तालुका संघटक सौ दळवी, सौ अर्चना तायशेटे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा