You are currently viewing सावंतवाडी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख पदी ॲड. कौस्तुभ गावडे यांची निवड…

सावंतवाडी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख पदी ॲड. कौस्तुभ गावडे यांची निवड…

सावंतवाडी :

शिवसेना नेते तथा खासदार विनायकजी राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर, आमदार वैभवजी नाईक, जिल्हाप्रमुख संजयजी पडते, युवासेना कार्यकारणी सदस्य रुची राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांनी सर्वांच्या उपस्थितीत सदर नियुक्ती जाहीर करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास शिवसेना उपनेते आमदार राजनजी साळवी, उपनेत्या जान्हवीताई सावंत उपस्थित होत्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते खा. विनायक राऊत साहेब यांना अभिप्रेत असलेले काम करेन असे ॲड. कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fifteen =