You are currently viewing केंद्र सरकार विरोधात पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी कुडाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा – बबन बोभाटे

केंद्र सरकार विरोधात पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी कुडाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा – बबन बोभाटे

कुडाळ
केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करुन जनतेचा भ्रमनिरास केला असुन या विरोधात जनतेच्या केंद्र सरकार विरोधी असंतोष असल्याने शिवसेना रस्त्यावर उतरत असुन शुक्रवार दी ५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना कार्यालय ते कुडाळ तहसीलदार असा मोर्चा निघणार आहे अशी माहिती शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी दीली.
यावेळी बोभाटे म्हणाले केंद्रातील भाजपा सरकारने लोकहीताच्या अनेक योजना बंद करुन आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करुन सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे जनताच आता या भाजपा सरकार विरोधात रस्त्यावर उतरत आहे म्हणून कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दी ५ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना कार्यालय ते कुडाळ तहसीलदार असा शिवसेनेच्या वतीने मोर्चा निघणार आहे असे बोभाटे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =