सातार्डा येथील अर्जुन सातार्डेकर यांनी केले दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान
सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे सहकार्य
सातार्डा
गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये विनोद गोवेकर (वय-६२) या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह (A -) रक्ताची गरज असल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्तदान चळवळीत अग्रेसर असलेल्या सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांना याबाबत कल्पना दिली.त्यांनी याबाबत सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे गोवा ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर यांना याबाबत कल्पना दिल्यावर त्यांनी सदर रुग्णाला या दुर्मिळ रक्तगटाचे रक्त मिळत नसल्याने दोन वेळा ऑपरेशन रद्द करण्यात आले होते.
यावेळी सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संजय पिळणकर यांनी याबाबतची माहिती सातार्डा येथील सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते अर्जुन उर्फ बाळो सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधून दिल्यावर त्यांनी तात्काळ जीएमसी ब्लड बँकेत जाऊन दुर्मिळ असे रक्तदान करून ऐन शिमगोत्सवात सामाजिक बांधिलकी जपली.यापूर्वीही अर्जुन उर्फ बाळो सातार्डेकर यांनी जीएमसी हॉस्पिटलमध्ये जाऊन अनेक रुग्णांसाठी दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताचे रक्तदान करून अनेक रुग्णांना मदत केली आहे.