You are currently viewing सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई

*सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई*

सिंधुनगरी

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी रु. एक कोटी एवढे कर्ज दिले होते सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र सहकार कायदा कलम ९१ नुसार दि.२८/१२/२०२३ रोजी सहकार न्यायालय क्रं. २ कोल्हापूर येथे बँक कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला होता. या दाव्या पोटी न्यायालयाने दिनांक २६/०३/२०२४ रोजी अंतरिम आदेश निर्गमित केला असून संस्थेची मालमत्ता तसेच संस्था अध्यक्ष श्री. चंद्रशेखर अर्जुन देसाई व अन्य संचालक यांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता विक्री अगर हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या कामी बँकेच्या वतीने अँड. अमोल पाटील,कोल्हापूर यांनी कामकाज केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + fourteen =