You are currently viewing होळीचे पूजन

होळीचे पूजन

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लघुकथा*

 

“होळीचे पूजन”

 

” आताशा नं बाबांणची चिडचिड फार वाढली ये! कधी म्हणून लवकर उठत नाही, पटपट आवरत नाहीत, मला वैताग आला या सगळ्याचा!”. ती नवऱ्याला सांगत होती. तोही ती ला, ठीक आहे म्हणत, चालायचंच असं म्हणत, ऑफिसला जायची पटपट तयारी करू लागला. दिवसें दिवस तिच्या सासऱ्यांची प्रकृती खालावत होती. रात्री लघवीला वारंवार जावं लागत होतं. अनुजा त्यांच करून आता थकत चाललेली होती. पण रोज ती नवऱ्याला म्हणजे अजयला काय सांगणार ? तो एकच उत्तर द्यायचा, होईल तेवढं कर ! ती मनातनं तडफडत होती. आधीच नोकरी आणि घरातलं पाहताना ती खूप वैतागयची. पोरांचा अभ्यास, डबे, घरात येणारे जाणारे, मुलांची मस्ती, बाबांच दुखणं, डॉक्टर कडे वारंवार दाखवायला जायचं, या सगळ्यात तिची खूप फरपट चालली होती. ती रोज देवाला प्रार्थना करायची, संपव बाबा हे सगळं लवकर!

एक तर बाबांचा कोणावर विश्वास नव्हता .साधे बँकेचे काम असले की ते स्वतः जायचे. ऑनलाईन करणे त्यांना काही जमत नव्हतं. घरात सगळे रागवायचे की शिकून घ्या, पण बाबांना त्या गोष्टीची भीती वाटायची. एवढं मोठं transaction कोणाच्या भरोशावर करणार?

असंच काही दिवसांनी ती तपासणीसाठी डॉक्टरांकडे बाबांना घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासल्यावर तिला एका बाजूला घेऊन सांगितलं की, ते आता जास्त जगणार नाहीत! “पण तुम्ही त्यांचे काळजी घ्यायला हवी”. अनुजा ने अनिच्छेने च हो म्हटलं. दिवस पास होत होते…

घटना २

बाबांची शेवटची जाण्याची निरवानीरवी ची भाषा व तयारी सुरू होती. त्यांनी एक दिवस सगळ्यांना बोलावून,” पोरांनो हे घ्या घराचे कागदपत्र ! हे माझं मृत्युपत्र ..हा माझा सगळा पैसा… म्हणून अनूजाच्या हातात चेक देताना सगळ्यांकडे एक टक पाहिले . अनुजा ला हीखूप रडू येत होते. तिला तिचं लग्न, या घरात नवीन नवरी म्हणून येणं, सासऱ्याने स्वतःच औक्षण करणं, नोकरीला जाताना डबा भरून देणे व मूलं लहान असताना पाळणा घरात न ठेवता त्यांनी स्वतः तिची व त्यांची घेतलेली काळजी, तिला त्रास झाला की रात्रभर जागे राहणारे, तिला आवडेल ते पदार्थ करून देणारे, शेवटी जाताना दिलेला भरभरून आशीर्वाद सगळेच ती आठवू लागली…

त्यांनी कधी तिचा राग राग केला नाही की तिच्याविरुद्ध अवाक्षर तिच्या माहेरी, नातेवाईकात किंवा मित्रमंडळीत काढले नाही. तिला हवं तेथे जाऊ दिले, स्वतः ट्रीपला नेले, तीला हवे ते कपडे घालू दिले, तिचे अश्रू थांबतच नव्हते. आपण काय दिले याबद्ल्यात या माणसाला? काहीच नाही! अनूजा अजयच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली. त्याने तिला थोपटले आणि शांत केले. आपण खूप लोभी आहोत हे तिला जाणवलं… दोनच दिवसात बाबा गेले.. विधी झाल्यावर तीने हळूच कपाट आवरायला घेतले. त्यांचे कपडे, काटकसरीने ठेवलेले पैसे, जूने फोटो, कागदपत्र सगळं नीट ठेवलं. तेरा दिवसांनी ती कामावर रुजू हे झाली.

यावर्षी च्या होळी, रंगपंचमीत तीचं मन रमत नव्हतं. जीवनातल्या एक प्रेमाचा, आशीर्वादाचा, काळजीचा रंग कायमचा हरवला होता. सुतक संपल्यावर आलेल्या होळीचे तिने अश्रू पूर्ण नयनांनी पूजन केले. प्रदक्षिणा घालताना मनाला एकच गोष्ट बजावत होती की”, हे होलिकामाते माझा जो सासऱ्यांवर राग होता, पैशाचा लोभ होता, तो या होळी त कायमचा दहन होऊ देत. यापुढे मी चुकूनही त्यांच्या बाबतीत काहीच वाईट बोलणार नाही. किंवा त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवणार नाही किंवा त्यांचा राग रागही ठेवणार नाही.. देवाने मला भरभरून दिले ! असं म्हणून तिने होलिका मातेला हळद कुंकू आणि खोबरं व्हायलं.

स्वतःला कुंकू लावलं आणि माघारी अश्रू पुसत ती घरी परतली. होलीकामाताही प्रसन्न मनाने तीला आशिर्वाद देत होती….. अखंड सौभाग्य वती भव! म्हणत..

 

लेखन. ©®. सौ योगिनी वसंत पैठणकर नाशिक.

 

 

*संवाद मिडिया*

 

*हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*Advt Link 👇*

——————————————

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

 

*हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*~3000~/- फक्त 999/- मध्ये*

 

*दि. 21 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 वेळ : स. 10 ते सायं. 5.00 वा.*

*स्ट्रेस टेस्ट*

* दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

*शिरोधारा*

* मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा थेरपी अतिशय उपयुक्त आहे.

 

*माधवबाग मल्टी डिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स*

 

*नाव नोंदणी आवश्यक*

 

*कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी*

 

*सावंतवाडी 7774028185*

*संचयनी पॅलेस, डॉ. जुवेकर जुना दवाखाना*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा