शिवसेना ठाकरे गटाच्या कणकवली तालुकाप्रमुख पदी कन्हैया पारकर
शहर प्रमुख रुपेश नार्वेकर, तालुका संघटक पदी राजू राठोड
माजी तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांना उपजिल्हाप्रमुख पदी बढती
विविध पदाधिकाऱ्यांच्या सामनामधून नियुक्त्या जाहीर
शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सामनामध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्ती नंतर आज कणकवलीत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये
यदु ठाकूर (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), अनंत (बंडू) ठाकूर (फोंडा, हरकुळ, नाटळ, कळसुली), शैलेश भोगले (कणकवली शहर, जानवली, कासार्डे, खारेपाटण), बुवा तारी (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर), नंदू शिंदे (वैभववाडी), काशिम ऊर्फ रज्जब रमदुल (कणकवली), तालुकाप्रमुख – मिलिंद साटम (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर), जयेश नर बापर्डे, पडेल, पुरळ), तालुका समन्वयक सुनील तेली (फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ), तालुकाप्रमुख – कन्हैयालाल पारकर (कणकवली शहर, जानवली, कासार्डे, खारेपाटण), डॉ. प्रथमेश सावंत (फोंडा, हरकुळ, नाटळ, कळसुली), तालुका संघटक – राजू राठोड (कणकवली तालुका), तालुका संपर्कप्रमुख – राजेश पावसकर (कणकवली तालुका), शहरप्रमुख रूपेश नार्वेकर (कणकवली शहर), संपर्कप्रमुख – सतीश गुरव विभाग (जि. प.). आदींची नियुक्ती करण्यात आली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, भरणी सरपंच अनिल बागवे, रोहित राणे, धीरज मेस्त्री, तेजस राणे, विभाग प्रमुख किरण वर्दम, गुरु पेडणेकर, आदित्य सापळे, युवा सेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश राणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.