You are currently viewing हिंदू जनजागृती समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

हिंदू जनजागृती समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

हिंदू जनजागृती समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता

मालवण

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ हि मोहीम राबवून किल्ल्यामध्ये स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील ५० धर्मप्रेमी युवक-युवती सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री भवानी देवी आणि शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील पाला पाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. तसेच गवत आणि काटेरी झाडी तोडण्यात आली. यासह गडावरील श्री भवानी देवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.
मोहिमेतील युवक, युवती यांना किल्ला रहिवासी श्री. हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे दिनानाथ गावडे, गोपाळ जुवलेकर, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. श्री शिवराजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सयाजी सकपाळ, हॉटेल व्यावसायिक श्री. विनय गावकर, श्री. संतोष खराडे, श्री. विजय केनवडेकर यांचे मोहीमे साठी विशेष सहकार्य लाभले. स्थानिक व्यावसायिक श्री. सचिन लोके यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले. मोहिमेच्या सांगतेच्या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, अशी माहिती हेमंत मणेरीकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा