You are currently viewing सांगेली येथील श्री देव गिरीजानाथ देवस्थानचा आज वार्षिक गिरोबा उत्सव…

सांगेली येथील श्री देव गिरीजानाथ देवस्थानचा आज वार्षिक गिरोबा उत्सव…

सांगेली येथील श्री देव गिरीजानाथ देवस्थानचा आज वार्षिक गिरोबा उत्सव…

सावंतवाडी

सांगेली गावचे ग्रामदैवत श्री देव गिरीजानाथ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अर्थात गिरोबा उत्सव आज सायंकाळी सांगेली-सनामटेंब येथे संपन्न होत आहे. त्यामुळे पूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आज सायंकाळी सुरुवात होणाऱ्या या सोहळ्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

ग्रामदेवतेची दरवर्षी पुनः प्रतिष्ठापना करणारे सांगेली येथील गिरिजानाथ हे एकमेव देवस्थान आहे. गिरोबाची मूर्ती फणसाच्या झाडातून साकारली जाते. महाशिवरात्रीपासून या उत्सवाला प्रारंभ झाला असून यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सनामटेंबवाडीतील तानाजी ऊर्फ न्हानू यशवंत सनाम यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात‌ आली आहे. या उत्सवासाठी उत्सव स्थळापासून सनामटेंबवाडीतील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

उत्सवात फणसाच्या झाडाची दररोज विधिवत पूजा करण्यात येत असून सायंकाळी ७.३० वाजता आरती केली जाते. आज या उत्सवाचा मुख्य दिवस असून सायंकाळी ४ वाजता गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह देवस्थानचे आठ-पाच मानकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने सनामटेंब येथे गिरोबा उत्सवस्थळी आल्यानंतर औक्षण व त्यानंतर “हर हर महादेव”च्या जयघोषात फणसाच्या झाडाला खाप लावण्यात येणार आहे. त्यानंतर गिरोबाची उत्सवमूर्ती हजारो भाविकांच्या साक्षीने घडविण्यात येणार आहे. त्यानंतर घडविण्यात आलेली गिरोबाची मूर्ती लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदिराकडे नेण्यात येणार आहे तर नंतर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा