You are currently viewing परराज्यातील अवजड वाहनांवर कारवाई करावी 

परराज्यातील अवजड वाहनांवर कारवाई करावी 

परराज्यातील अवजड वाहनांवर कारवाई करावी

‌‌मनसेच्या वतीने  जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात अवजड तसेच विना परवाना सुरू असलेल्या वाहनांवर कारवाई करावी आणि जिल्हयातील अवैध वाहतूक रोखावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे उप जिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम, देवगड किंजवडे विभाग अध्यक्ष परेश आडकर आदी उपस्थित होते.निवेदनात नमूद केले आहे की, परराज्यातून मोठ्या प्रमाणात डंपर, जेसीबी, टॅक्टर, बोअरवेल मशीन, टैंकर व इंधन वाहतूक करण्यासाठी जिल्ह्यात येतात. ही वाहने आपल्या राज्यात काम करीत असताना कोणतेही परमीट घेत नाहीत. डंपर, ट्रॅक्टर यांच्यावर योग्य ती नंबर प्लेट नसते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेट नसतात. काही चालकांचे वय कमी असते. त्यांचे लायसन, इन्शुरन्स, पीयूसी नसते. पाणी व इंधन वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे टँकरना बघितल्यावरच कळते की, पासिंग झालेले नसते व फिटनेस सर्टिफिकेट नसणारच. जिल्हयात रस्त्यांची, धरणांची व इतर कामे सुरू आहेत. या ठिकाणी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे, असेही नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा