You are currently viewing मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कार पार्किंग केल्याच्या रागातून धक्काबुक्की

मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कार पार्किंग केल्याच्या रागातून धक्काबुक्की

मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कार पार्किंग केल्याच्या रागातून धक्काबुक्की

गाडीची हवा सोडल्या प्रकरणी १६ रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी

मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात कार पार्किंग केल्याच्या रागातून बांदा येथील व्यावसायिक संदेश कल्याणकर यांच्यासह त्यांच्या पुतण्याला धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची हवा सोडल्याप्रकरणी मळगाव रेल्वे स्टेशन रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष आनंद गोसावी यांच्यासह तब्बल १६ रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार श्री. कल्याणकर यांनी  उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.

श्री. कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याणकर हे आपला पुतण्या आशिष कल्याणकर यांच्या समवेत काही कामानिमित्त बांदा येथून मळगाव रेल्वे स्टेशनवर गाडी पार्क करून मुंबई येथे गेले होते. तेथून काल परतले असता त्यांच्या गाडीच्या ३ चाकांची हवा काढलेली दिसली. त्यामुळे त्यांनी झालेल्या प्रकार हा खेदजनक वाटल्यामुळे या प्रकाराबाबत फेसबुक लाईव्ह केले व यात झालेला प्रकार हा निंदनीय आहे. हा रिक्षा चालकांकडून प्रकार झाला असून त्याचा आपण निषेध करतो, अशी नाराजी व्यक्त केली. यावेळी तेथे जमलेल्या रिक्षा चालकांना संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत, अशी त्यांना विचारणा केली. यावेळी त्या ठिकाणी आनंद गोसावी हे संघटनेचे अध्यक्ष असल्याचे तेथील काही लोकांनी सांगितले. यावेळी तेथे आलेल्या गोसावी यांना विचारणा केल्यानंतर आम्ही तुमच्या गाडीची हवा सोडली नाही, असे सांगून तुम्ही या ठिकाणी गाडी कशी काय पार्क केली? असा सवाल श्री. गोसावी यांनी केला.

आमचे रिक्षाचे अधिकृत पार्किंग आहे, असे सांगून आम्ही आतापर्यंत अशा १६ गाड्यांच्या हवा काढल्या. त्यानंतर लोकांनी आपल्या गाड्या टो करून नेल्या, असे सांगत कल्याणकर व त्यांच्या पुतण्याला धक्काबुक्की केली. झालेल्या प्रकाराबाबत कल्याणकर यांनी काल सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.

आज चौकशीसाठी बोलवणाऱ्या पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना तुम्ही काय ते करून घ्या, गुन्हा दाखल करा, असे सांगून अध्यक्ष गोसावी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या श्री. कल्याणकर यांनी त्यांच्या विरोधात आज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गैरकायदा जमा करून धक्काबुक्की करणे तसेच कल्याणकर यांचे नुकसान करणे, धमकी देणे याप्रकरणी (1) MH 07 AH 3485, (2)ΜΗ 07 AH 0501,(3) MH 07 AH 3421, (4) MH 07 AH 3603, (5) MH 07 AH 3609, (6) MH 07 AH 0664, (7) ΜΗ 07 AH 1813, (8) MH 07 AH 3486, (9) MH 07 AH 3112. (10) MH 07 AH 0419,

 

(11) MH 07 AH 1864, (12) ΜΗ 07 AH 1060, (13) ΜΗ 07 AH 1585. (14) MH 07 AH 0664, (15) MH 07 AH 1421, (16) ΜΗ 07 AH 7333 या नंबरच्या १६ रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + five =