You are currently viewing सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला ‌लागलेल्या भीषण आगीत  अंदाजे ५० लाखांचे नुकसान

सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला ‌लागलेल्या भीषण आगीत  अंदाजे ५० लाखांचे नुकसान

सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला ‌लागलेल्या भीषण आगीत  अंदाजे ५० लाखांचे नुकसान

घटनास्थळी गटविकास अधिकारी आर. डी. जंगले यांनी भेट..

वैभववाडी

सडूरे सोनधरणे येथे काजू बागेला भीषण आग लागली. या आगीत काळे कुटुंबीयांच्या आंबा काजू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या आगीची तीव्रता एवढी भीषण होती. या आगी मध्ये पाच ते सहा बागा जळून खाक झाल्या. या घटनेत अंदाजे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.

श्री. विजयसिंह विठ्ठलराव काळे, जनार्दन भैरू काळे, अजितसिंह विठ्ठलराव काळे, जयसिंह जनार्दन काळे यांच्या बागेंचे नुकसान झाले आहे. या घटनेत सार्वजनिक नळ योजनेच्या पाण्याची पाईप लाईन जळून खाक झाली आहे. घटनास्थळी गटविकास अधिकारी आर. डी. जंगले यांनी भेट देली. सरपंच दिपक चव्हाण, कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी विस्तार अधिकार प्रकाश अडूळकर यांनी पाहणी केली.

यावेळी कृषी सहाय्यक यू व्ही मंदावाडा, मंडळ कृषी अधिकारी सी. एम. कदम, कृषी सहाय्यक डी. डी. म्हासेकर, ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोनकर, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, कोतवाल मोहन जंगम व बागायतदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा