You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात ‘महाराष्ट्र कब्बडी दिन’ उत्साहात संपन्न’

अर्जुन रावराणे विद्यालयात ‘महाराष्ट्र कब्बडी दिन’ उत्साहात संपन्न’

शालेय विद्यार्थ्यांनी कब्बडी खेळत शंकरराव साळवी यांना वाहिली आदरांजली

वैभववाडी प्रतिनिधी

आज १५ जुलै शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा जन्मदिवस ‘महाराष्ट्र कबड्डी दिन’ या नावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात सांस्कृतिक व क्रिडा विभागाच्या वतीने आज आंतरशालेय कब्बडी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कब्बडी खेळत शंकरराव साळवी यांना आदरांजली वाहिली. प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस. यांनी शंकरराव साळवी व कब्बडी खेळ या बाबत विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी श्रीफळ वाढवून कब्बडी सामन्यांची सुरवात केली.
दुपारच्या सत्रात पावसानेही थोडावेळ विश्रांती घेतल्याने शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने खेळात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक नादकर बी.एस., माध्यमिक विभाग प्रमुख पाटील एस.एस., सांस्कृतिक विभाग प्रमुख चोरगे एम.एस., क्रिडा शिक्षक तुळसणकर एस. टी.,शिक्षक पवार पी. बी., केळकर ए.जी., सावंत पी.पी., बोडेकर जे.एस., परिट ए.एस., भोवड पी.एन. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − six =