You are currently viewing वेंगुर्ला राष्ट्रवादी काँगेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

वेंगुर्ला राष्ट्रवादी काँगेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

वेंगुर्ला
खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निबंध स्पर्धा व सोडत पद्धतीने बुथ कमिट्यांमधील विजेत्यांची निवड जाहीर केली आहे.
निबंध स्पर्धेत कु. सानिका तांडेल, युक्ता तांडेल, तन्वी आरांवेदकर, दिपराज तांडेल यांनी क्रमांक पटकाविले. तर बुथ कमिट्यांमधील सोडत पद्धतीने काढलेल्या विजेत्यांमध्ये तन्मय तांडेल व रमाकांत सोनू नाईक (पॅण्ट-शर्टपीस) तसेच दिव्या दिलीप अणसूरकर व रंजना वेर्णेकर (पैठणी) यांचा समावेश आहे. विजेत्यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर, नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, सेवादल जिल्हाध्यक्ष धर्मजी बागकर, तसेच मकरंद परब, सत्यवान साटेलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =