You are currently viewing थंडी संपली राया आता…

थंडी संपली राया आता…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लावणी*

 

*थंडी संपली राया आता …*

 

थंडी संपली राया आऽऽऽऽऽ ता

उन्हाळा झाला सुरू..

राया आता बांधिन मी घुंगरू..

राया आता बांधिन मी घुंगरू..

 

पावसाळ्या आधी फिरून येऊ

गावो गावी राया

घुंगरू माझे पहा बोलती

रसरसलेली काया..

ढोलकीवरती पडता थाप होऽऽऽ

नर्तन होईल सुरू…

राया आता बांधिन मी घुंगरू…

 

पावसाळ्याची करू बेगमी

बक्कळ पैका कमवू

आरामात मग बसून खाऊ

शरीर आता श्रमवू …

भरजरी घ्याना शालू आताऽऽऽऽ

लाडाने सांगते सरू…

राया आता बांधिन मी घुंगरू

 

जत्रंमध्यी जाऊ राया

हंगाम होईल सुरू

गावोगावी फिरता राया

देवदेवही करू..

चला तयारी करू या आताऽऽऽ

जत्रा होतील सुरू…

हाती सुपारी घेऊन राया

श्रीगणेशा करूऽऽऽऽऽ

राया आता बांधिन मी घुंगरू…

राया आता….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + nineteen =