सावंतवाडी :
एसएनआरआरग्रुप व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर २४ फेब्रुवारी १० मार्च दरम्यान आयोजित २० षटकांच्या खुल्या लेदर बॉल क्रिकेट “सुंदर वाडी चषक २०२४” स्पर्धेत संवाद मीडिया इलेव्हन विजेता तर प्रितिका इलेव्हन गोवा संघ उपविजेता ठरला. या लेदर बॉल खुल्या स्पर्धेचे आयोजन संतोष केनवडेकर, रघुनाथ धारणकर, राजन नाईक, नॉबर्ट माडतीस यांच्या संकल्पनेतून यशस्वीरित्या झाले. या स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी या भागातील संघानी सहभाग घेतला होता.
प्राथमिक फेरीचे सामने चार संघाचे चार गटात साखळी पद्धतीने घेण्यात आले. एकूण सोळा१६ संघानी भाग घेतला. प्रत्येक सहभागी संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायला मिळाले. ‘अ’ गटातून दीपक कुडाळकर अकॅडमीचा कुडाळेश्वर संघ, ‘ब’ गटातून स्वप्निल चेंदवणकर संघ व राजेश नाईक यांचा संवाद मीडिया इलेव्हन संघ, ‘क’ गटातून गोवा पोलीस प्रितिका इलेव्हन संघ तर ‘ड’ गटातून सुनील मिशाळ यांचा ओम स्पोर्ट संघाने उपांत्य फेरी प्रवेश मिळविला.
पहिल्या उपांत्य फेरीच्या ओम स्पोर्ट्स विरुद्ध संवाद मीडिया संघातील सामना संवाद मीडिया संघाने जिंकला. संघाने २० षटकात ८ बाद ११५ धावा केल्या. ओम स्पोर्ट संघ १९.२ शतकात सर्व बाद ९९ धावत गारद झाला.
दुसऱ्या उपांत फेरीच्या सामन्यात प्रीतिका इलेव्हन गोवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १७ षटकार ७ बाद १३४ धावा केल्या. उत्तरा दाखल कुडाळेश्वर संघाने ९ बाद ११९ धावा केल्या. प्रितीका इलेव्हन गोवा संघाने अंतिम फेरी प्रवेश केला.
साखळी गटात सुनील मिशाळ यांच्या ओम स्पोर्ट संघाचा व मकरंद तोरसकर यांच्या बांदेश्वर संघातील सामना टाय झाला. त्यामध्ये सुपरओव्हर खेळवली गेली. सुपरओव्हर मध्ये ओम स्पोर्ट्स संघाने तीन धावांनी विजय मिळविला.
अंतिम सामना संवाद मीडिया इलेव्हन आणि प्रितीका इलेव्हन गोवा संघात झाला. प्रितीका गोवा संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व २० षटकात सर्व बाद १०४ धावा जमविल्या. त्यात किथ पिंटो १८, आदित्य सूर्यवंशी ११, मनोज तांडेल १७ धावा केल्या. संवाद मीडियाच्या शुभम तारीख व कदम यांनी प्रत्येकी ३-३ बळी मिळविले. यादव व गावकर यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळावीले. उत्तरादाखल संवाद मीडिया संघाने १८.४ षटकात १०८ धावा केल्या. त्यात शिवेंद्र भुजबळ यांनी १६ धावा, सोहम पानवलकर २३ तर शंतनू कदम नाबाद १८, सलमान मुंडे नाबाद ९ धावा केल्या. प्रितिका इलेव्हन संघातर्फे गोलंदाजी करताना अनिकेत परबने १३ धावात ४ बळी, दर्शन मिशाळ २५ धावा २ बळी मिळविले.चुरशीच्या सामन्यात संवाद मीडियाने तीन गडी व आठ चेंडू राखून विजेतेपद संपादन केले.
हा संघ रोख १ लाख २५ हजार व सुंदर वाडी चषक २०२४ मानकरी ठरला. तर उपविजेत्या प्रितिका इलेव्हन संघाला रोख ७५ हजार रुपये व सुंदर वाडी उपविजेता चषक २०२५ बहाल करण्यात आला.
बक्षीस समारंभ शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, रोटरी क्लबचे प्रवीण परब, आबा कशाळीकर, अंबादास इंगळे, परशुराम चलवाडी, राजन पोकळे यांची उपस्थिती होती. यावेळी केसरकर यांनी पुढील वर्षी स्वतंत्र स्टेज उभारावी लागणार नाही अशी आश्वासन दिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कै. रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ सुसज्ज्ञ पॅव्हेलियन पुढील वर्षापासून उपलब्ध होईल. तसेच नाल्यावर स्लॅबवर मातीची लेव्हल करून ६५ मीटरचे पूर्ण ग्राउंड तसेच सीमारेषेबाहेर मल्टीगेम्सचे क्रीडा संकुल होणार आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक दीपक केसरकर यांनी तर द्वितीय पारितोषिक ॲड. अनिल निरवडेकर यांनी पुरस्कृत केले. सुधीर नाईक व राजन हावळ यांनी टी शर्ट व पँट पुरस्कृत केले. तर परशुराम चलवाडी यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य पुरस्कृत केले.