You are currently viewing कोळंब येथे युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या..

कोळंब येथे युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या..

ऐश्वर्या भोजने, सौ. यशस्त्री चव्हाण, सौ. सेजल पवार यांची निवड; कुडाळ मालवण समन्वय प्रमुख सौ. शिल्पा खोत यांची माहिती..

 

मालवण :

 

कुडाळ मालवणच्या युवती सेना समन्वय प्रमुख सौ. शिल्पा खोत यांनी आमदार वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना विस्तारीकरणाच्या दृष्टीने पदाधिकारी नियुक्तीचा झंझावात सुरु केला आहे. कोळंब विभागात मंगळवारी युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात कोळंब शाखाप्रमुख पदी ऐश्वर्या चंद्रकांत भोजने, बूथ अध्यक्ष पदी सौ. यशस्त्री यशवंत चव्हाण तर उपशाखाप्रमुख पदी सौ. सेजल किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ. खोत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावेळी सरपंच सौ. सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, पूजा तळाशीलकर, शांती तोंडवळकर, दिया पवार, साक्षी मयेकर, दीपा पवार आदी उपस्थित होते. यावेळी शिल्पा खोत यांच्या वतीने पक्षांसाठी दहा पाण्याची भांडी उपलब्ध करून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − one =