You are currently viewing राजनंदिनी राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२३ कवियत्री किरण चौधरी यांना प्रदान…

राजनंदिनी राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२३ कवियत्री किरण चौधरी यांना प्रदान…

जळगाव :

 

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फ़े नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली येथील कवयित्री सौ. किरण महादेव चौधरी यांना साहित्यभूषण, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनानिमित्त रविवार, दि. १७  सप्टेंबर रोजी २०२३ अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

ही संस्था अंध, अपंगांना रस्त्यावर भीक न मागू देता त्यांचे पुनवर्सन, स्वावलंबन आणि स्वाभिमान याच्यावर भर देतात. कोणी रस्त्यावर भीक मागत असल्यास त्यांना छोट्या खानी रोजगारासाठी भांडवल उभे करून देण्यात येते. त्यांचे आरोग्य व त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर भर दिला जातो.

तसेच ग्रामीण भागातील निराधार, गरजू मुलींच्या उच्च शिक्षणावर भर देण्यास मदत करीत असते. यात अनेक मुलींचे मातृ- पितृ छत्र हरवले आहे. काहींच्या कुटुंबावर अनाहुत संकट आले. अशा संकटातील मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये, म्हणून त्यांचे पालकत्व स्वीकारण्यात येते. त्या मुलींचे कोर्स ३ ते ४ वर्षांचे असतात. शैक्षणिक फी एका एका वर्षाची ५० हजार ते दीड लाख असते. या व्यतिरिक्त वर्षभरात समाजोपयोगी विविध कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात असतात.

ही संस्था अनेक उपक्रम राबवित असते व महाराष्ट्र मधून कला,सामाजिक,सांस्कृतिक प्रसिद्ध असणाऱ्या महिला व पुरुषांना पुरस्कार देत असते

पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यातील महिला पुरस्कार नवेगाव कॉम्प्लेक्स येथील सौ किरण महादेव चौधरी साहित्यभूषण व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात.

महाराष्ट्रातुन विविध क्षेत्रातील ज्ञानवंत, गुणवन्त, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, आदी क्षेत्रातून आलेल्या शेकडो प्रस्तावातून सौ किरण महादेव चौधरी यांची निवड झाली. कलेक्टर ऑफिस, जळगाव येथे सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काबरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ महेंद्र काबरा, उदघाटक, माजी सैनिक अधिकारी सुरेश पाटील, महापौर धनश्री पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पी. के .पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील,सुरेश वाघ,शिवराज पाटील, रमेश पाटील व राजनंदिनी बहुउद्देशीय अध्यक्ष संदीपा वाघ आदीच उपस्थिती होती.

कवयित्री सौ किरण महादेव चौधरी यांचा त्रिवेणीचा संगम हा कवितासंग्रह प्रकाशित असून, लवकरच “आले आभाळ भरून” हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. आजपर्यंत त्यांनी विविध काव्यप्रकारात काव्यलेखन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा