सिंधुदुर्गातील ३० दशावतारांच्या मंडळांना साहित्यासह वाहन खरेदीसाठी अनुदान मिळणार – रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ
शिवसेना नेते तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत, राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे.
सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत तसेच राज्याचे शालेय शिक्षण, मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे. शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र शिवसेना नेते, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याजवळ केली किरण सामंत यांनी राज्याचे शालेय शिक्षण, मराठी राष्ट्रभाषा मंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांच्याजवळ याबाबतच्या मागणीचे पत्र दिले. दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तत्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली. या कार्यपद्धतीवर खुश होऊन दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी शिवसेना नेते, सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत तसेच राज्याचे शालेय शिक्षण, मराठी राष्ट्रभाषा मंत्री दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचे आभार व्यक्त केले.