You are currently viewing महिला प्रिमीअर लिग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात आज आरसीबी आणि मुंबई भिडणार

महिला प्रिमीअर लिग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात आज आरसीबी आणि मुंबई भिडणार

*अंतिम फेरीमध्ये दिल्ली विरुद्ध कोणता संघ खेळणार?*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आह होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ या हंगामात दुसऱ्या स्थानावर राहिला तर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. बुधवारी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात मेग लॅनिंगच्या संघाने पुन्हा एकदा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. गेल्या मोसमातही दिल्लीने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती.

 

शुक्रवारी (१५ मार्च) मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. मंधानाच्या संघाने या मोसमात एकूण आठ सामने खेळले, ज्यात चारमध्ये विजयाची चव चाखली. त्याचवेळी मुंबईने आठपैकी पाच सामने जिंकले. या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन साखळी सामने खेळले गेले, एक सामना हरमनप्रीत कौरच्या संघाने तर दुसरा सामना आरसीबीने जिंकला. त्याचवेळी, गेल्या मोसमातही दोन्ही संघांमध्ये दोन साखळी सामने झाले ज्यात मुंबईने दोन्ही सामने जिंकले. अशा स्थितीत पाहिले तर मुंबईचा वरचष्मा आहे.

 

आरसीबीची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने १२ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या १९व्या लीग सामन्यात दमदार कामगिरी केली. तिने महिला प्रिमियर लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी करत १५ धावांत सहा बळी घेतले. त्यानंतर तिने नाबाद ४० धावाही केल्या. पेरीच्या बळावर मुंबईच्या १९ षटकांत ११३ धावा झाल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या आणि सात गडी राखून विजय मिळवला. सामनावीर एलिस पेरीच्या संस्मरणीय अष्टपैलू कामगिरीमुळे आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. एलिमिनेटर सामन्यातही महिला खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fifteen =