You are currently viewing नळपाणी योजनेतून झिरंग बाहेरचा वाडा भागात पाण्याच्या टाकीचे ‌ राजू बेग यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

नळपाणी योजनेतून झिरंग बाहेरचा वाडा भागात पाण्याच्या टाकीचे ‌ राजू बेग यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

नळपाणी योजनेतून झिरंग बाहेरचा वाडा भागात पाण्याच्या टाकीचे ‌ राजू बेग यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

सावंतवाडी

झिरंग म्हाडा कॉलनी मध्ये नगरपालिकेच्या जागेत नळपाणी योजनेतून आज पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. हे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष राजू बेग यांच्या हस्ते झाले.

या योजनेसाठी राजू बेग यांचे 25 वर्ष प्रयत्न सुरू होते. एप्रिल – मे महिन्यात पाण्यासाठी झिरंग ‌ तसेच बाहेरचा वाडा ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. आता या योजनेमुळे झिरंग ‌ तसेच बाहेरचा वाडा भागात 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. 1 लाख 50 हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले.

या भूमिपूजनावेळी भारती मोरे, राजू बेग, शोएब बेग, अनारोजीन लोबो, बाबू कुडतडकर, तसेच झिरंग भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा