मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी
कणकवली :
कोकणावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई गोवा महामार्गाला द्या, ठाकरेंबद्दल राणेंना बोलण्याचा अधिकार नाही.
अख्या जगावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट नाव कोरले आहे. त्यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये. मुबंई - गोवा राष्ट्रीय महामार्ग होत आहे, त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, ही मागणी मनसेची आहे. मी आजही बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. आता हे उपरे सत्ताधारी व विरोधक विमानतळ नामांतर श्रेयवाद करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.
राणे व त्यांच्या पुत्रांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली. शिवसेना संपविण्याची भाषा केली. त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो, आम्ही राहिलो नसतो तर आताची शिवसेना राहिली नसती. आता पुतण्या मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आग्रह करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भाषा केली. काही वक्तव्य केल्याने त्याची माफी राणेंना मागावी लागली. राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायचा अधिकार नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी व विधानसभेतीळ विरोधी पक्ष नामांतर वरून श्रेयवाद करत आहे. हे विमानतळ किती दिवस चालेल? त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं किती योग्य आहे? लातूर, नाशिक, कोल्हापूर ही विमानतळे बंद पडली आहेत. बाळासाहेब ठाकरे हे जनसामान्यांसाठी जे बोलत ते करत होते. त्यामुळे मुबंई पुणे ह्या रस्त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे