You are currently viewing कणकवली नगरपंचायत येथील कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप केंद्र बंद ठेवल्याने कामगार संतप्त…

कणकवली नगरपंचायत येथील कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप केंद्र बंद ठेवल्याने कामगार संतप्त…

कणकवली नगरपंचायत येथील कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप केंद्र बंद ठेवल्याने कामगार संतप्त…

शेकडो कामगारांची कणकवली नगरपंचायत परिसरात गर्दी ; भांडी वाटप करणा-या कंपनीच्या स्टॉक मध्ये ठणठणाट..

कणकवली

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम महामंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी गृहोपयोगी भांडी संच वाटप सुरु केले आहे. जिल्ह्यातील ९ हजार नोंदणीकृत कामगारांना शासनाने नियुक्त केलेल्या मोपतलाल एजन्सी मार्फत जिल्ह्यातील कुडाळ , कणकवली , मालवण , सावंतवाडी , देवगड या ५ तालुक्यांमध्ये वाटप सुरु करण्यात आले. मात्र कणकवली नगरपंचायत येथे सुरु असलेल्या वाटप केंद्रावर कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अपेक्षेने आलेल्या शेकडो कामगारांची निराशा झाली आहे. कंपनीच्या कणकवली येथील केंद्रावर भांडी संच संपल्याने त्यांच्या स्टॉक मध्ये ठणठणाट झाला आहे. त्यामुळे या कणकवली भांडी वाटप केंद्रावर आलेले शेकडो कामगार संतप्त झाले आहेत.

कणकवली नगरपंचायत येथे बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी ३० भांड्यांचा संच वाटप शनिवार पासून करण्यात आले. जशीजशी जनजागृती झाली . तशी ऑनलाईन नोद करण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून बांधकाम कामगारांनी रांगा लावल्या . गेले ३ दिवस या कामगारांची अक्षरक्ष : होरपळ सुरु आहे. महाराष्ट्र्र शासन कामगार महामंडळ व नियुक्त केलेली मोपतलाल एजन्सी ज्यांचे नियोजन ढासळले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य बांधकाम कामगारांना बसला आहे. या कंपनीचे प्रतिनिधी भांडी वाटप केंद्रावर आलेले नसल्याने तीव्र संताप बांधकाम कामगारांमधून व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा