You are currently viewing वेताळ बांबर्डे गावात भाजपला शिवसेनेचा धक्का

वेताळ बांबर्डे गावात भाजपला शिवसेनेचा धक्का

*वेताळ बांबर्डे गावात भाजपला शिवसेनेचा धक्का*

*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश*

वेताळ बांबर्डे गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते बाळा म्हापणकर, नाना मेस्त्री, रजनीनाथ (राजू) बांबर्डेकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. गावात शिवसेनेची संघटना आणखी मजबूत करणार असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, देवस्थान कमिटी अध्यक्ष आप्पा गावडे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, विभाग प्रमुख नरेंद्र राणे वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, बाबुराव देऊलकर, आनंद भोगले, राजू गवंडे, बाळा भोसले, ग्रा. सदस्य सुदिव्या सामंत, माजी सरपंच दिलीप तिवरेकर, प्रताप पाटकर, बाळा गावडे, सतीश बांबर्डेकर, आनंद सामंत, योगेश ठाकुर, बाबा मुजावर, रेश्मा तिवरेकर, रामदास गावडे,संतोष कदम, निलेश गवाणकर, विलास सामंत, यतीन सामंत, अशोक गोडकर, रमण गावडे, चंद्रकांत गावडे, दिलीप गावडे, रवी घाडी, सचिन तिवरेकर, बाळा राजाध्यक्ष, सागर पाटकर,शुभम पाटकर, जयवंत गावडे, सुंदर पाटकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा