You are currently viewing गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन

गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन

*गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन*

*कणकवली*

गांधीनगर येथे  दिनांक 9 रोजी दुपारी 3वाजता धरणाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार कार्यसम्राट श्री.नितेश राणे साहेब, माजी जी. प.अध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जी.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत,सरपंच श्री.मंगेश बोभाटे, उपसरपंच श्री.राजेंद्र सावंत, माजी सभापती श्री.सुरेशजी सावंत, दादा सावंत,आबा सावंत,रमेश सावंत,संतोष सावंत,कांता सावंत,सुनील सावंत,राजा सापळे,गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदेश सावंत यांनी सांगितले की भाजप पक्ष्यात एक वर्षापूर्वी मी शब्द दिला होता की विकासाची गंगा माननीय आमदार श्री.राणे साहेब यांच्या माध्यमातून आणणार,आणि इतर कामे मी आणली आणि या वर्षातले मोठे काम म्हणजे 95कोटींचे धरणाचे अधिकृत भूमिपूजन केले आहे.नुसत्या वल्गना केल्या नाही.नंतर आमदार साहेबांनी या गावांसाठी धरण आणण्यासाठी कसा पाठपुरावा करून,याच महिन्यात वर्क ऑर्डर आणून आज भूमिपूजन करून दीलेल्याशब्दाला राणे फॅमिली जगते हे सांगितले,याही पुढे अनेक कामे मी करीन हे आश्वासन दिले.यावेळी श्री.अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा