You are currently viewing सावंतवाडीचा आठवडा बाजार मोती तलावाच्या काठावर…

सावंतवाडीचा आठवडा बाजार मोती तलावाच्या काठावर…

सावंतवाडी

कोरोनाच्या काळापासून सावंतवाडी शहरातील आठवडा बाजार कोठे भरावा, याबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटल्यात जमा आहे. नगराध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा बाजार आजपासून येथील मोती तलावाच्या काठावर भरला. त्यामुळे नागरीकांसह व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केले.
गेली काही वर्षे येथील उभाबाजार ते पांजरवाडा परिसरात हा बाजार भरविला जात होता. मात्र त्या ठिकाणच्या काही नागरीकांनी विरोध केल्यामुळे हा बाजार जिमखाना मैदानावर हलविण्यात आला होता. यावरुन शिवसेना आणि भाजपात मोठे रणकंदन माजले होते. त्यानंतर कोरोना आल्यामुळे आठवडा बाजाराचा विषयच बाजूला पडला होता. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे लक्षात येताच हा बाजार मोती तलावाच्या काठावर भरविण्यात येईल, असे नगराध्यक्ष परब यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यानुसार आज बाजार भरला. सकाळच्या सत्रात व्यापार्‍यांचा थंडा प्रतिसाद होता. मात्र काल रात्री पासून काहींनी प्लास्टीक टाकून त्या ठिकाणी जागा अडविलेल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी प्रतिसाद मिळेल आणि वाद ही होणार नाही, असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =