You are currently viewing शिवरात्रीच्या निमित्ताने हिरण्यकेशी येथे भाविकांची गर्दी…

शिवरात्रीच्या निमित्ताने हिरण्यकेशी येथे भाविकांची गर्दी…

शिवरात्रीच्या निमित्ताने हिरण्यकेशी येथे भाविकांची गर्दी…

आंबोली

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आंबोली-हिरण्यकेशी येथे शिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी आज गर्दी केली.

यावेळी नारळ ठेवणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम पहाटेपासून सुरू झाले. आंबोली गावच्या वतीने मंदिर परिसर सजावट तसेच विद्युत रोषणाई तसेच इतर व्यवस्थापन करण्यात आले. याठिकाणी एस टी महामंडळाकडून बसेसची सुविधा करण्यात आली.

आंबोली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दत्ता देसाई, दीपक शिंदे, पिरणकार, मनीष शिंदे यांच्यासह गृहरक्षक शिपाई बंदोबस्तासाठी आहेत.

हिरण्यकेशी नदी कुंडात ही अनेकांनी स्नान केले. याठिकाणी अनेक दुकाने व्यावसायिक ही आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कोल्हापूर, गोवा तसेच लगतच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक आज दाखल झाले. हिरण्यकेशी हे स्वयंभू देवस्थान पवित्र देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.हिरण्यकेशी या कोकणातील पूर्व वाहिनी नदीचा उगम या ठिकाणी गुहेत आहे. ही ८८ किलोमीटर नदी कर्नाटक गोकाक येथुन मग अरबी समुद्राला मिळते. याचबरोबर येथील राघवेश्वर मठ येथेही विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. लिंगाचे मंदिर येथेही कार्यक्रम करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा