You are currently viewing उद्या आकेरीत महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; तर १० मार्चला देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव

उद्या आकेरीत महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; तर १० मार्चला देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव

आकेरी :

 

आकेरीतील श्री देव रामेश्वर देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव रविवारी १० मार्च रोजी संपन्न होणार आहे. या उत्सवाची प्रतिवर्षी माघ शुध्द दशमीला सुरवात होते. उद्या ८ मार्चला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या निम्मिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

८ मार्च ला पहाटेपासून अभिषेक, दर्शन, नवस, गाऱ्हाणे, रात्री भजन गायनाचा कार्यक्रम, पालखी व रात्री आडदशावतार, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. दर्श अमावस्येदिनी १० मार्चला पहाटेपासून अभिषेक, दर्शन, सायंकाळी गायनाचा कार्यक्रम, रात्री पुराण पालखी आणि “श्रीं ची रथातून सवाद्य भव्य मिरवणूक” काढण्यात येणार आहे. भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे अशी विनंती देवस्थान समितीचे अध्यक्ष, गावकर व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा