जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे ८, ९ व १० मार्च रोजी सावंतवाडीत आयोजन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग डिस्टक्ट कॅरम असोसिएशनची पाचवी इंडियन ऑईल वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद व आंतर क्लब (तालुका) कॅरम स्पर्धा ८, ९ व १० मार्च रोजी सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे होणार आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष एकेरी व आंतर क्लब (तालुका) अशा विविध गटांमधे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राजेश निर्गुण (सावंतवाडी), शुक्राचार्य म्हाडेश्वर (कुडाळ), पांडुरंग पाताडे (कणकवली), किरण मालवणकर (मालवण), प्रकाश प्रभू (देवगड) या तालुका प्रतिनिधींमार्फत ६ मार्चपर्यंत आपल्या प्रवेशिका द्यायच्या आहेत. ही स्पर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलित नियमावलीनुसार खेळविण्यात येईल. प्रत्येक खेळाडूने स्पर्धा नियमावलीनुसार पांढरा टी-शर्ट व फूलपँट घालून सामने खेळणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे. ही स्पर्धा इंडियन ऑईल कॉर्पो. लि. ने पुरस्कृत केली असून विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येतील. अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर (७६२०७५५७६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.