You are currently viewing २० वर्षे बंद असलेले तरेळे वाघाचीवाडी धरणाचे काम आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झाले सुरू

२० वर्षे बंद असलेले तरेळे वाघाचीवाडी धरणाचे काम आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झाले सुरू

२० वर्षे बंद असलेले तरेळे वाघाचीवाडी धरणाचे काम आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झाले सुरू

*पुनर्वसन अनुदानातील त्रुटी आणि तफावती दूर करून योग्य मोबदला देणार

*३३१ हेक्टर जमीन येणार ओलीताखाली

*आमदार नितेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांशी समन्वय साधत सिंचन प्रकल्पाला दिली चालना

कणकवली;

तरेळे वाघाचीवाडी येथील गेली वीस वर्षे बंद असलेला लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आमदार नितेश राणे यांनी धरणग्रस्त कुटुंबांच्या समन्वयातून मार्गी लावला. या धरणाच्या उर्वरित कामाचा शुभारंभ सर्व प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला. पुनर्वसन अनुदानातील तफावत आणि त्रुटी दूर करून धरणग्रस्तांना योग्य तो मोबदला देण्याची हमी आमदार नितेश राणे यांनी दिली. त्यामुळे वीस वर्षे म्हणजे दोन तपानंतर वाघाचीवाडी धरणाचे काम आज पुन्हा सुरू झाले.या प्रकल्पामुळे ३३१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बंद पडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आणि त्यातीलच एक भाग म्हणजे तरेळे वाघाचीवाडी येथील सिंचन प्रकल्प जो २० वर्ष रखडलेला होता तो आमदार नितेश राणे यांनी शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून या धरणाला निधी उपलब्ध करून दिला.त्यामुळे या परिसरातील ३३१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामाची सुरुवात पुन्हा करण्यात आली. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी,नायब जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, यांच्या समवेत तसेच प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठका घेतल्या.त्या बैठकातून प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी असा समन्वय साधत विकासाला गती दिली.
आजच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार नितेश राणे यांचे समवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाळा जठार, सरपंच हनुमंत तळेकर,उपसरपंच शैलेश सुर्वे, धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष दशरथ बांदिवडेकर, राजू जठार, विष्णू भोगले,मोहन भोगले, ग्रा. पं. सदस्या रिया चव्हाण ,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता महादेव कदम, उपविभागीय अधिकारी मंगेश माणगावकर यांच्यासह उदय तळेकर, विश्वजीत तळेकर , प्रकाश घाडी ,संतोष तांबे, निलेश पवार ,अमर पवार ,चंद्रकांत चव्हाण, कदम मामा,अमर पवार असे अनेक ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
दादांनी मंजूर केलेला हा प्रकल्प त्यांच्या मुलाने पूर्णत्वास न्यावा
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या लघुपाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी दिली होती. आवश्यक असलेला निधीही त्यावेळी दिला होता. पुनर्वसनाचे कामही त्यांनी युद्ध पातळीवर करून घेतले होते. २००५ मध्ये भूसंपादन झाले. आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अर्धवट राहिली.त्या दिवसापासून हळूहळू या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत गेले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी एका स्तुत्य हेतूने सुरू केलेला हा प्रकल्प त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी हाती घेतलेला आहे.याचे आम्हाला समाधान वाटते. हा प्रकल्प त्यांनी तो पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तानी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा