You are currently viewing मी-मी करणार्‍यांना विमान उडविण्यासाठी दिल्लीतून चिपीत यावे लागेल…

मी-मी करणार्‍यांना विमान उडविण्यासाठी दिल्लीतून चिपीत यावे लागेल…

– पालकमंत्री उदय सामंत

सावंतवाडी

चिपी विमानतळाचे काम मीच केले आहे, मीच विमान उडवणार आहे, असा दावा करणार्‍यांना विमान उडविण्यासाठी चिपीत यावे लागणार आहे. दिल्लीतून येथील विमान उडणार नाही, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव घेता लगावला.
चिपी विमानतळ हे सिंधुदूर्ग जिल्ह्यात येते. त्यामुळे जरी केंद्र सरकार विमान वाहतूकीस परवागनी देत असले, तरी त्या विमानतळासाठी आवश्यक असलेले रस्ते,पाणी या सुविधा राज्य सरकारच पुरविणार आहे. त्यामुळे कोण मी-मी करीत असेल, तर ते शक्य नाही. हे एक सांघिक काम आहे,असा ही टोला त्यांनी लगावला.
नुकतीच कुडाळ येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत श्री.राणे यांनी विमानतळ मीच आणले आणि त्यावरुन विमान मीच उतरणार आणि उडवणार सुध्दा, असा दावा केला होता. या दाव्याला धरुन श्री.सामंत यांनी आज राणेंवर नाव न घेता टिका केेली. मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेवून मोर्चेबांधणी करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 7 =