You are currently viewing आरोस माऊलीचा उद्या जत्रोत्सव

आरोस माऊलीचा उद्या जत्रोत्सव

बांदा

आरोस गावातील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 22 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन भाविकांनी करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असे कार्यक्रम सादर होणार आहेत. सामाजिक अंतर राखून तसेच नियमांचे पालन करून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा