You are currently viewing आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीयांच्यावतीने भाविकांना विशेष आवाहन
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीयांच्यावतीने भाविकांना विशेष आवाहन

मालवण :

 

मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील आंगणे कुटुंबियांच्या सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी जगभर कीर्ती असलेल्या श्रीदेवी भराडी मातेच्या जत्रोत्सव २ मार्च २०२४ ला संपन्न होत आहे. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समस्त आंगणे कुटुंबीयांच्या वतीने भाविक भक्तांसाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे.

या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व आपल्या नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीत येतात. या सर्व यात्रेकरुंची देवीच्या दर्शनाची सोय ९ रांगातून केलेली आहे. या रांगातून सर्वांना देवीचे व्यवस्थित दर्शन होणार आहे. आंगणेवाडीत येणाऱ्या सर्व भाविकांनी देवीचे दर्शन प्रस्तावित केलेल्या रांगेतूनच घ्यावे आणि आंगणे कुटुंबीयांना सहकार्य करावे.

पहाटे देवीची पूजाअर्चा झाल्यावर ३.३० वाजल्या पासून दर्शनाला सुरुवात होईल रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेता दुसऱ्या दिवशी ही सायंकाळी ४ वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे अपंगासाठी मालवण एसटी स्टँड आणि कणकवली येथून रिक्षाची व्यवस्था केली आहे. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने सुलभ शौचालय उभारण्यात आल्यामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. भाविकांनी देवीचा फोटो, व्हिडिओ काढू नये, असे आवाहन आंगणे कुटुंबीयांच्या वतीने देवस्थान मंडळ अध्यक्ष श्री भास्कर आंगणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 3 =