You are currently viewing भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा….*

*कॉलेजमध्ये ‘मराठी श्रुतलेखन’ स्पर्धेचे आयोजन…..*

*सावंतवाडी*

येथील येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.रमण बाणे यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले._
_मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या ग्रंथालय विभागातर्फे ‘मराठी श्रुतलेखन’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुप्रसिद्ध लेखक आर.के.नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ या पुस्तकातील उताऱ्याचे प्रा.तेजा शेणई यांनी वाचन केले. ते ऐकून स्पर्धक विद्यार्थ्यांनी सदर उताऱ्याचे लिखाण केले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यामध्ये कोमल सोनवणे हिने प्रथम, गायत्री भैरवकर हिने द्वितीय व साहिल गावडे याने तृतीय क्रमांक पटकावला. सुयोग जोशी व ऋचा खरात यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले._
_मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व व आजच्या युगात मराठीचे संवर्धन याविषयी प्राचार्य डॉ.बाणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर यांनी केले. त्यांना ग्रंथालय सल्लागार समितीचे सहकार्य लाभले.

*संवाद मीडिया*

🟧*सुवर्णसंधी..*🟧
🟥*इतका कमी व्याज दर पुन्हा नाही..*🟥

सर्वात जास्त विकली जाणारी आणि या श्रेणी मधील ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग सर्टिफ़ाइड एकमेव एसयूवी *टाटा नेक्सोन*
आता ७.९९%* एवढ्या कमी व्याज दराने..

एंट्री मॉडेल पासुन
🔸६ एअरबॅग ,
🔸एलईडी हेडलैंप , टेललैंप आणि डीआरएल ,
🔸इको-सिटी-स्पोर्ट्स या तीन मल्टी ड्राइव मोड ,
🔸सेंट्रल लॉकिंग ,
🔸रिवर्स पार्किंग सेंसर ,
🔸हिल होल्ड असिस्ट,
🔸इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम
आणि मॅाडेल नुसार बरेच काही…

रु.८.१४ लाख ईएसपी पासुन सुरु..

टेस्ट ड्राइव , डेमो आणि एक्सचेंज करीता आजच कॅाल करा
*त्वरा करा..ॲाफर २७ फ़ेब्रु पर्यंतच आणि हजर स्टॉक वर*

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/126757/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा